Pune : शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीमध्ये तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट जाळून खाक (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये एका इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील एक फ्लॅट पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास टिळक रस्त्यावर महाराष्ट्र मंडळासमोरील एका इमारतीमध्ये घडली. आग लागल्याचे कळताच घरातील व्यक्तींनी बाहेर धाव घेतल्यामुळे सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आग एवढी प्रचंड होती की इमारतीच्या बाहेर खिडकीमधून ज्वाळा बाहेर येत होत्या.

  

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.