Pune : आंबेगाव बुद्रुक येथील अशोक लेलँड कंपनीच्या गोडाऊनमध्ये आग ;15 लाखांचे गाड्यांचे सुटे भाग जळून खाक

एमपीसी न्यूज – आंबेगाव बुद्रुक येथील अशोक लेलँड कंपनीच्या गोडाऊनला आग लागून 15 लाखांचे गाड्यांचे सुटे भाग जळून खाक झाले. ही घटना आज मंगळवारी (दि.15) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेबाराच्या दरम्यान आंबेगाव बुद्रुक येथील अशोक लेलँड गोडाऊनमध्ये आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. या आगीमध्ये चारचाकी मोठ्या वाहनांचे सुटे भाग असलेले सर्व बॉक्स मोठ्या प्रमाणात पेटले होते. अग्निशमन दलाची तीन वाहने घटनास्थळी पोहचली यामध्ये कात्रज, सिंहगड व मध्यवर्ती स्थानकातून तीन वाहने घटनास्थळी दाखल झाली.

अग्निशमनदलाच्या अथक प्रयत्नांनी रात्री दीडच्या सुमारास पूर्ण आग विझली. अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकले नसून सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.