Pune : शनिवार पेठेमध्ये इमारतीमधील औषधाच्या दुकानाला आग

एमपीसी न्यूज- पुण्यात शनिवार पेठेमध्ये प्रभात टॉकीज समोरील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आज, गुरुवारी सकाळी आग लागून तळमजल्यावर असलेले औषधाचे दुकान भस्मसात झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही 

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभात टॉकीज समोरील जोशी संकुलच्या पहिल्या मजल्यावर सकाळी पावणेनऊच्या सुमारास औषधांच्या दुकानात आग लागली. या आगीच्या धुरामुळे इमारतीमधून खाली उतरणे रहिवाशांना शक्य झाले नाही. काही रहिवाशी इमारतीच्या गच्चीवर अडकून पडले होते.

अग्निशामक विभागाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान, गच्चीवर अडकलेल्या रहिवाशांना सुखरूप खाली उतरवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like