BNR-HDR-TOP-Mobile

Pune : लाल महालाच्या शेजारी असलेल्या दुकानांना आग

0 208
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- लालमहालाशेजारी जिजामाता चौकात असणाऱ्या दुकानांना आज पहाटे आग लागली. या आगीमध्ये सायकलचे मोठे गोडाऊन व इतर दुकानांचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आग पूर्ण आटोक्यात आली असून कुलींगचे काम सुरु असल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले. सुदैवाने या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

आग विझवताना धुराचे मोठे प्रमाण मोठे असल्यामुळे अडचणी येत होत्या. धुर काढण्यासाठी अग्निशामक दलाकडून सर्किट ब्रेकर, बीए सेट, ब्लोअर, कॉक्रीट हॅमरचा वापर करण्यात आला. दरम्यान, इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षितपणे गच्चीवर हलवण्यात आले असून या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.