Pune : जांभूळवाडीत दरीपुलाखालील फायबरचे दरवाजे बनविणाऱ्या वर्कशाॅपला आग

एमपीसी न्यूज – जांभूळवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावरील दरीपुलाखाली फायबरचे दरवाजे बनविणाऱ्या अंदाजे दीड हजार चौ.फूट जागेतील वर्कशाॅपला दुपारी पाऊणे दोनच्या आग लागली. आगीत सामानाचे नुकसान झाले असून सुदैवाने माञ, कोणतीही मनुष्यहानी झाली नाही, असे सूत्रांनी सांगितले आहे.

पंधरा मिनिटात पोलीस, अँब्यूलन्स व अग्निशामक दलाच्या गाड्या तत्काळ दाखल.आग विझण्याचे काम सुरू आहे. आग शाॅक सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग नियंञणात आल्यानंतर नुकसानीचा अंदाज घेता येईल, असे मालक दत्ता जांभळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.