Pune : ‘कर्तव्य पहिले वाढदिवस नंतर’ असे म्हणत पुणे अग्निशमन दलाच्या जवानाची तत्परता

एमपीसी न्यूज – कोंढवा, कौसर बाग येथे (Pune) आज (शनिवारी) पहाटे आगीची घटना घडली. यावेळी अग्निशमन दलाकडून घटनेचे गांभीर्य ओळखून शर्तीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण आणले. यात सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.

त्या जवानांमध्ये कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्रातील जवान दशरथ माळवदकर यांचाही सहभाग होता. त्यांचे विशेष असे की आज त्यांचा 54 वा वाढदिवस आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांनी पुढचा-मागचा कोणताही विचार न करता वर्दीच्या ठिकाणी जात आग विझवण्याचे कर्तव्य आधी पार पाडले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

माळवदकर हे अग्निशमन दलात गेली 22 वर्षे सेवा बजावत (Pune) आहेत. ते आज सकाळपाळीला जाताना कुटूंबियांनी त्यांचे औक्षण करीत ड्युटीवर जाताना सुट्टी घेण्याचा आग्रह केला असता त्यांनी “कर्तव्य पहिले वाढदिवस नंतर” असे म्हणत ते ड्युटीकरिता घराबाहेर पडले.

Kondhwa : कौसर बाग येथे भंगार मालाच्या गोडाऊनला व गॅरेजला आग

कारण त्यांना कोंढवा येथील आगीची घटना कळाली होती व आपण सुट्टी न घेता आगीच्या वर्दिवर जाणे हे त्यांनी गरजेचे समजून तत्परतेने ड्युटीवर जाऊन आपले कर्तव्य बजावले.

घटनास्थळी असलेले अग्निशमन अधिकारी समीर शेख, पंकज जगताप, सुनिल नाईकनवरे, कैलास शिंदे व इतर जवानांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या कामाचे कौतुक केले. अग्निशमन दलाचे जवान नेहमीच आपल्या कर्तव्याला महत्व देत कामगिरी चोख बजावतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.