BNR-HDR-TOP-Mobile

Pune : हडपसर येथे अज्ञात इसमाकडून गोळीबार; एकजण ठार

एमपीसी न्यूज – हडपसर येथे अज्ञात इसमाकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यात एकाच मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गंगानगर हडपसर येथे मयूर गुंजाळ आणि तेजस कल्याणी यांच्यामधील जुन्या वादातून शिकलकरी कल्याणी याने मयूर गुंजाळ यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यामध्ये फूटपाथवरून जात असणाऱ्या वयोवृद्ध स्वामी यांच्या पायाच्या पंजाला गोळी लागली.

  • त्यांना तात्काळ नोबेल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने त्याचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. घटनास्थळी हडपसर पोलिस स्टेशनचे पोलिस हजर आहेत.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3