BNR-HDR-TOP-Mobile

Pune : दोन गटामधील किरकोळ वादातून बांधकाम व्यावसायिकाच्या गाडीवर गोळीबार

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – दोन गटामध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका बांधकाम व्यावसायिकाच्या गाडीवर गोळीबार झाला. या घटनेत बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा थोडक्यात बचावला. ही घटना शुक्रवारी (दि. 4) रात्री उशिरा हडपसरच्या हांडेवाडी, सातवनगर परिसरात घडली.  

निलेश शेखर बिनावत (वय 25) असे या गोळीबारात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सद्दाम सलीम पठाण (वय 25, रा.सय्यदनगर) याला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा कुप्रसिद्ध टिपू पठाण या सराईत गुंडाच्या टोळीमधील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. अन्य 18 ते 20 आरोपी फरार झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, महंमदवाडी रोड परिसरात टिपू पठाण या सराईत गुंडाची दहशत आहे. शुक्रवारी मध्यरात्री निलेश बिनावत आणि पठाण याच्या साथीदारांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यामध्ये बिनावतच्या साथीदारांना पठाणच्या साथीदारांनी मारहाण केली. हे समजल्यानंतर बिनावतच्या साथीदारांनी टिपू पठाण याच्या घरावर जोरदार दगडफेक केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस येत असल्याचे पाहून सर्वानी तेथून पळ काढला.

घरावर दगडफेक झाल्याने संतापलेल्या टिपू पठाणने बिनावत राहत असलेल्या हांडेवाडी रस्त्यावरील बंगल्यावर हल्ला केला. त्यावेळी निलेश बिनवत हा लँड क्रुझर गाडीमधून बहिणीला आणण्यासाठी निघाला होता. त्याला पाहून पठाण याच्या साथीदारांनी त्याचा दुचाकीवरून पाठलाग सुरु केला. त्यानंतर गाडीच्या दिशेने एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्या. यामध्ये निलेश जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.