Pune: खेड तालुक्यात पोलीस पाटलावर गोळीबार

pune: firing on police patil at bhamburwadi khed स्थानिक राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचे समोर येत आहे.

एमपीसी न्यूज- पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात गोळीबाराची घटना घडली आहे.  वरची भांबुरवाडी येथे एका पोलीस पाटीलवर गोळीबार करण्यात आला. सचिन वाळुंज असे जखमी पोलीस पाटलाचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

या प्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना ताब्यात घेतले असून स्थानिक राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचे समोर येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस तपास करत असून जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.