Pune: शहरात कोरोनाचा कहर! 24 तासांत पाचजणांचा मृत्यू, एकूण 13 बळी

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाने कहर चालविला आहे. गेल्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू झाल्याने शहरातील आतापर्यंतचा कोरोनाच्या बळींचा आकडा 13 वर जाऊन पोहचला आहे.

मागील 24 तासात पुण्यात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून या रोगामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या आता तेरा झाली आहे. ससून रुग्णालयातील तिघांचा, नोबल हॉस्पिटलमधील एकाचा तर नायडू रुग्णालयातील एक अशा पाच जणांचा मुत्यू झाला आहे.

पुण्यात आज नवीन नऊ रुग्णांचे कोरोना निदान चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही भर पडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.