Pune : पुणे महापालिकेतील पाच नगरसेवक विधानसभेत

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेतील पाच नगरसेवकांना आता विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. भाजपच्या विद्यमान महापौर मुक्‍ता टिळक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील टिंगरे, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे तसेच पीएमपीएमएलचे अध्यक्ष सिद्धार्थ शिरोळे यांचा त्यामध्ये समावेश आहे.

पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एकाचवेळी पाच नगरसेवकांची विधानसभेवर वर्णी लागलेली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत नगरसेवक योगेश टिळेकर हडपसरमधून, तर कोथरूडमधून प्रा. मेधा कुलकर्णी विधानसभेवर निवडून आले होते. 2009 च्या निवडणुकीत पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ, खडकवासला मधून भीमराव तापकीर आणि कोथरुडमधून चंद्रकांत मोकाटे विधानसभेत गेले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.