Pune : पाच दिवसांचा आठवडा सुरु: वेळेवर येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

एमपीसी न्यूज – राज्य सरकारच्या ‘पाच दिवसांचा आठवडा’ या उपक्रमाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. वेळेवर येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे.

तर, जिल्हा परिषद कर्मचारी वेळेत यावेत, यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांनी गांधीगिरीचा अवलंब केेला आहे. वेळेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे.

नवीन वेळेनुसार म्हणजे सकाळी पावणे दहापर्यंत येणार सर्व कर्मचाऱ्यांचे अशाप्रकारे गुलाबपुष्प कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.