Pune : मेट्रोचे साहित्य चोरणाऱ्यांना अटक

एमपीसी न्यूज- मेट्रोचे साहित्य चोरणाऱ्या तीन महिलांसह पाच जणांना (Pune) चतु:शृंगी पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून मेट्रोचे चोरलेले साहित्य जप्त करणात आले.

अनिल सुजान काळे (वय 18), दीपक मारूती काळे (वय 25, रा. थेरगांव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत सुरेश लावंडे (वय 23) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लावंडे मेट्रोमध्ये पर्यवेक्षक आहेत.

बाणेर, बालेवाडी परिसरातील मेट्राे खांबासाठी लागणाऱ्या लोखंडी पट्ट्या आरोपी काळे यांनी चोरुन नेल्या होत्या. दोघे जण ओैधमधील ज्युपिटर रुग्णालयाच्या परिसरातील एका भंगार माल दुकानात लोखंडी पट्ट्या विक्री करण्यासाठी आले होते. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर दोघांना पकडण्यात आले.

Chakan : औद्योगिक क्षेत्रातील कंपनी प्रतिनिधी व पिंपरी चिंचवड पोलिसांची समन्वय बैठक संपन्न

दरम्यान, चतु:शृंगी पोलिसांनी मेट्रो साहित्याची चोरी केल्या प्रकरणी तीन महिलांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या गणेशखिंड रस्त्यावर आचार्य आनंदऋषीजी चौकात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाच्या ठिकाणावरुन सळई, नट असे साहित्य महिलांनी चोरले होते. पोलिसांनी तीन महिलांना अटक केली असून त्या जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट (Pune) वसाहतीत राहायला आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.