Pune : अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या पाच जणांना अटक; एक कोटींचा गांजा जप्त

ट्रक आणि इनोव्हासह सुमारे १४९ पॅकेट्स जप्त; कस्टम अधिकारयांची कारवाई

एमपीसी न्यूज – अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या पाच जणांना पुणे कस्टम अधिकारयांनी अटक केली आहे. पिंपळेगाव खडकी येथे मंचर-निरगुडसर मार्गावर हि कारवाई आज करण्यात आली. यात सुमारे १४९ पॅकेट्स आढळले असून त्यात सुमारे ८३५. ४८ किलोग्रॅमचा गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत सुमारे १ कोटी २५ लाख ३२ हजार २०० रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, पुणे युनिटच्या कस्टम अधिकारयांना पिंपळेगाव खडकी येथे मंचर-निरगुडसर मार्गावर एक ट्रक (एपी२७ डब्लू २४६१) आणि इनोव्हा (एमएच १२ क्यू एफ ४५६७) हि वाहने संशयास्पद आढळली. या वाहनांची तपासणी केली असता सुमारे ८३५. ४८ किलोग्रॅमचा गांजा आढळला असून या दोन्ही वाहनातील पाच जणांवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत बेकारदेशीरपणे अंमली पदार्थाची वाहतूक केल्याप्रकरणी अटक केली आहे.

  • यात दीपक (पूर्ण नाव माहित नाही.) हा ट्रकचा चालक असून त्यासोबतच किन्नर अमित ज्ञानेश्वर बिडकर, आणि इनोव्हामधील गुंडूराव पाटील, इलैयाबक्स बाबनियां मुंडे आणि नासिर गफूर पठाण अशी पाच जणांची नावे आहेत.

या पाच जणांना खेड न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे. पुणे हद्दीत सध्या डीआरयायच्या अधिकाऱ्यांनी केलेली हि मोठी कारवाई समजली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.