Pune : शहरात पाच ठिकाणी निर्जंतुकीकरण कक्ष स्थापन सुरू -गणेश बिडकर

एमपीसी न्यूज – दाटीवाटीने राहत असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पाच ठिकाणी निर्जंतुकीकरण कक्ष आजपासून सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांनी दिली.

निर्जंतुकीकरण क्षेत्र (sanitization chamber) हा एक कक्ष आहे. ज्याचा वापर, वैद्यकीय आणि इतर क्षेत्रांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी केला जातो. यामध्ये ‘प्रेशर फॉगिंग सिस्टम’ असते. यातुन एका वेळास एक व्यक्ती ‘10 सेकंद’ उभा राहिल्यास, त्याचे निर्जंतुकीकरण होऊन त्याचा परिणाम पुढील काही तासांसाठी राहतो.

मारुती मंदिर जवळ, 305- सोमवार पेठ, भिमनगर चौकाजवळ, मंगळवार पेठ, खडीचे मैदान, सोमवार पेठ, सदा-अानंद नगर, मंगळवार पेठ, शिराळ शेठ चौक, रास्ता पेठ या ५ ठिकाणी निर्जंतुकीकरण कक्ष स्थापन केलेले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

आपल्या भागात घरपोच सेवा देणाऱ्या लोकांनी मालासह, आपण या कक्षातूनच प्रवेश करून हा माल घरपोच करावा, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे उभारण्यात आले आहे.

जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना घरी जाण्यासाठी याचा उपयोग नागरिकांना करता येईल. प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच हा कक्ष चालू राहील. किराणा माल खरेदी, भाजी पाला खरेदी करताना नागरिकांना या कक्षाचा उपयोग होणार आहे.

या भागात तैनात असलेले सर्व पोलिस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, बँकेचे कर्मचारी, सर्व अत्यावश्यक सेवा देणारे दुकानदार यांनीदेखील घरी जाताना या कक्षातून प्रवेश करून जावे, असे आवाहन गणेश बिडकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.