Pune : राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पाच हजार लोकांना अन्नदान, मास्कचे वाटप

Five thousand people donated food and masks on the occasion of Rahul Gandhi's birthday

एमपीसीन्यूज : अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आज (शुक्रवारी) पुण्यात पाच हजार लोकांना अन्नदान तसेच पाच हजार मास्कचे वाटप, कोरोना योद्धयांचा सन्मान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता पाळून हे कार्यक्रम करण्यात आले. लडाखमध्ये चीन बरोबर झालेल्या चकमकींमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रद्धांजली वाहाण्यात आली.

त्यानंतर गोरगरीब, गरजू, पीडित अशा पाचहजार जणांना फूड पॅकेट्सच्या स्वरुपात अन्नदान करण्यात आले. पॅकेट्समध्ये भात, भाजी, पोळ्या, आमटी आणि एक गोड पदार्थ याचा समावेश होता.

_MPC_DIR_MPU_II

शहरात बुधवार पेठ, फरासखाना जवळील मजूर अड्डा, मंगळवार पेठ कामगार पुतळा झोपडपट्टी, शंकरशेठ रोडवरील पारधी वस्ती, गाडीतळ, कात्रज कदम वस्ती, शिवाजी नगर गावठाण आदी ठिकाणी फूड पॅकेट्स तसेच मास्कचे वाटप करण्यात आले.

कोवीड-१९ चे संकट तसेच भारत-चीन सीमेवरील आपल्या जवानांचे हौतात्म्य लक्षात घेऊन केक कापणे, घोषणाबाजी करणे, बॅनर्स, होर्डिंग लावणे अशा गोष्टींना फाटा देऊन पीडित, गरीब, गरजूंची गरज लक्षात घेऊन अन्नदान करण्यात आले, असे मोहन जोशी यांनी सांगितले.

या संकटकाळात लोकांच्या दुःख, वेदना दूर करण्यासाठी आणि आधार देण्याच्या हेतूने कार्यक्रम करावेत, असा संदेश अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिला होता त्याचे पालन पुण्यात गांभीर्याने करण्यात आले, असे जोशी म्हणाले.

या कार्यक्रमात सर्वश्री शेखर कपोते, प्रवीण करपे, शाबीर खान, प्रशांत सुरसे, सुभाष थोरवे, चेतन आगरवाल, सुरेश कांबळे, नरेश नलावडे, सागर कांबळे, नीलेश मोता, संदीप आटपाळकर, सोहन वजरे, सुनिल दैठणकर, सुनिल शिर्के, नरेश धोत्रे, सनमितसिंग चौधरी आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.