Pune : पावणेतीन वर्षीय चिमुकलीच्या यकृताच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

एमपीसी न्यूज – पावणेतीन वर्षाच्या चिमुकलीचे यकृत निकामी झाल्याने डॉक्टरांनी तिच्या यकृताचे प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला आहे. या शस्त्रक्रियेसाठी 25 लाख रुपये खर्च येणार आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने चिमुकलीच्या नातेवाईकांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील तृषा परदेशी ही पावणेतीन वर्षाची चिमुकली पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अतिदक्षता विभागात मागील दहा दिवसांपासून उपचार घेत आहे. तिचे यकृत (लिव्हर) निकामी झाला आहे. तिच्या यकृताचे प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
तसेच या शस्त्रक्रियेसाठी 25 लाख रुपये खर्च सांगितला आहे. तृषाच्या घरच्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची आहे. त्यामुळे ते हा आर्थिक भार पेलू शकत नाहीत. त्यांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. तृषाच्या पालकांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

  • मदतीसाठी संपर्क –
    बँक – बँक ऑफ महाराष्ट्र
    नाव – राजेश बाबुलाल परदेशी
    मोबाईल – 9511674561 (google pay / paytm)
    खाते क्रमांक – 60180707605
    आयएफएससी कोड – MAHB0000717
    एमआयसीआर कोड – 411014073

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.