Pune : किटकांच्या टोर्नेडोला तापमानातील चढ उतार कारणीभूत- हवामान खाते

एमपीसी न्यूज – केशवनगर आणि खराडी गावठाण भागात ( Pune ) नदीपात्रात कीटकांचे थवे दिसून आले होते. अनेक नागरिकांनी याचे व्हिडीओ काढून समाजमाध्यमांवर टाकले होते. नदीपात्रात पाण्याची पातळी वाढल्याने हे डासांचे थवे, असे उडत असल्याचे सांगितले जात होते. सौम्य हिवाळा, भरपूर आर्द्रता आणि जास्त रात्र अशा काही तात्कालीक कारणामुळे डासांच्या उत्पत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते जे डासांचे वादळ किंवा ‘डास टोर्नेडो’ला कारणी भूत ठरू शकतात असा अंदाज हवामान खाते व कीटकशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

हवामान खात्याच्या नोंदीनुसार शिवाजीनगर आणि पाषाण सारख्या प्रदेशात किमान तापमान कमी आहे, तर खराडी, मुंढवा आणि केशवनगर सारख्या इतर भागात रात्रीचे तापमान 18-21°C पर्यंत नोंदवले गेले आहे.

Pune :  नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे आयोजन 

तापमान आणि आर्द्रतेची इष्टतम पातळी बहुतेक कीटकांमध्ये प्रजनन क्रिया सक्रिय करते. साचलेले पाणी असलेल्या भागात, तापमान आणि आर्द्रता यांचे योग्य संयोजन चक्र वाढवू शकते, ज्यामुळे अंडी- आणि डासांची संख्या वाढते.

आयएमडीच्या माहितीनुसार, सध्याचे वातावरण हे डासाच्या उत्पत्तीसाठी पोषक आहे. त्यामुळे डासांच्या संख्येत पुढील काही कालावधीत वाढ होईल व पर्यायाने डेंग्यू व मलेरियाच्या विषाणूमध्ये देखील वाढ होईल. डासांमुळे होणाऱ्या आजारांनाही हे अनुकुल वातावरण असेल त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी ,असे आवाहन हवामान खात्याने ( Pune ) केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.