Pune news: अन्नपदार्थ विक्री करताना स्टेपलर पिनचा वापर न करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज: अन्नपदार्थ विक्री करताना स्टेपलर पिन व चिकटपट्टीचा वापर करु नये,(Pune News) असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त सं. भा. नारागुडे यांनी केले आहे.

Alandi Garbage: आळंदीत कचर्‍याची गंभीर समस्या, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

भारतीय खाद्य सुरक्षा मानके प्राधिकरणाच्या निर्देशानुसार, सर्व अन्न व्यावसायिकांनी कागद व प्लास्टिक पिशवीत ग्राहकांना घरपोच खाद्यपदार्थ देण्यासाठी पिशवी पॅक करताना स्टेपलर पिनचा व चिकटपट्टीचा वापर करु नये.(Pune News) ग्राहकांच्या जीवितास धोका पोहोचणार नाही तसेच आरोग्यास बाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही अन्न व औषध प्रशासन विभागाने दिल्या आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.