PUNE : काही क्षणासाठी दरवाजा उघडा ठेवला अन चोरट्यांनी संधी साधली

तब्बल सात लाख रुपयांचा ऐवज चोरला

एमपीसी न्यूज – सकाळी दरवाजा उघडा ठेऊन दूध आणण्यासाठी बाहेर जाणे गोखलेनगर येथील एका महिलेला चांगलेच महागात पडले. काही क्षणातच चोरट्यानी तब्बल सात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी शारदा बोराडे (वय 50) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोखलेनगर परिसरात राहतात. आज सकाळी त्या दरवाजा उघडा ठेऊन शेजारी असणाऱ्या दुकानात दूध आणण्यासाठी गेल्या होत्या. हीच संधी साधून काही अज्ञात चोरट्यानी घरात शिरून ड्रॉवरमध्ये ठेवलेले रोख 2 लाख 26 हजार आणि पाच लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक अभिजित जोगदंड अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.