Pune : आत्महत्या करण्याची धमकी देत महिलेवर जबरदस्ती; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज-आत्महत्या करण्याची धमकी देऊन एका महिलेला जबरदस्तीने रिक्षात बसवून (Pune) अंधाऱ्या ठिकाणी घेऊन जात तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भोसले नगर मध्ये 3 जून रोजी रात्रीच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला.

प्रशांत भंडारी (राहणार पांडव नगर पोलीस चौकीजवळ, हेल्थ कॅम्प, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 35 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

Hadapsar : हडपसरमध्ये भरधाव कारच्या धडकेत स्वच्छता कर्मचारी महिलेचा जागीच मृत्यू

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच परिसरात राहण्यासाठी आहेत. एकमेकांच्या ओळखीचेही आहेत. 3 जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या लक्ष्मी रोड येथे सामान आणण्यासाठी जात होत्या. त्या मंजाळकर चौकात आले असताना आरोपीने फिर्यादी यांना रिक्षात बस नाहीतर आत्महत्या करून तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवेन अशी धमकी दिली.

त्यानंतर फिर्यादीला जबरदस्तीने रिक्षात बसण्यासाठी भाग पाडून रिक्षा यशवंत घाडगे नगर बाग येथे अंधारात नेली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी सोबत अंधारात अश्लील कृत्य केले. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी (Pune) गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.