BNR-HDR-TOP-Mobile

Pune : दोन इराणी पर्यटकांना स्थानिक तरुणांकडून मारहाण

एमपीसी न्यूज- एका किराणा दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन इराणी पर्यटकांना काही स्थानिक तरुणांनी मारहाण केली. ही घटना सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात रविवारी घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, इराण येथून पर्यटन व्हिसावर महमद हुसेन ( वय 27) व महमद अबाद (28) दोन इराणी पर्यटक मुंबईत आले होते. या पर्यटकांना मुंबईतून पुण्यात येण्यासाठी एका टुरिस्ट कंपनीमार्फत कारसह चालक व एक गाईड सोबत देण्यात आला होता. सिंहगड रस्त्यावर माणिकबाग परिसरात आल्यानंतर खरेदीसाठी चालक व गाईड खाली उतरून किराणा दुकानात गेले. त्याठिकाणी या दोघांचा दुकानदारासोबत वाद झाला.

ते पाहून कारमध्ये बसलेल्या इराणी पर्यटकांनी घाबरून स्वतः कार चालवत तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. ते पाहून किराणा दुकानात असणाऱ्या तरुणांनी कारचा पाठलाग करून पर्यटकांना मारहाण करीत कारच्या काचा फोडल्या. दरम्यान, टुरिस्ट कंपनीने दिलेला चालक व गाईड किराणा दुकानदार बरोबर झालेल्या वादानंतर दोघांनी पळ काढला.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement