Pune : वन्यजीवांसाठी जंगलात पाणवठा

एमपीसी न्यूज़- प्रचंड उकाड्याच्या काळात पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या जंगलातील प्राण्यांसाठी (Pune) पाणवठ्याची सुविधा उपल्ब्ध करून देण्यात येत आहे. पाणवठा उपल्ब्ध करून देण्याचे काम सध्या युध्द पातळीवर सुरू आहे.
तप्त उन्हामुळे वन्य प्राण्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. पाण्याअभावी अनेक प्राणी शहरात, गावात शिरकाव करीत आहेत.त्यामुळेच या वन्य प्राण्यासाठी पाणवठा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.
मुख्यवनसंरक्षक एन. आर. प्रविण, उपवनसंरक्षक पुणे (Pune) श्राहुल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक, मयुर बोठे व वनपरिक्षेत्र अधिकारी शिरोता सुशिल मंतावर यांच्या मार्गदर्शनाखाली युद्ध पातळीवर हे काम सुरू झाले आहे.
Pune News : आयुक्त विक्रम कुमार यांनी सादर केले पुणे शहराचे अंदाज पत्रक
त्यापैकी मौजे राकसवाडी येथील पुर्ण झालेल्या पाणवठ्यामध्ये वन्यजीवांसाठी टॅंकरव्दारे पाणी सोडण्यात आले. सदर ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतावार,(Pune) वनपरीमंडळ अधिकारी उकसान, एम बी.घुगे तसेच वनरक्षक जी.बी.गायकवाड, वनरक्षक डी.डी.उबाळे उपस्थित होते.