Pune : शेतकरी आणि ग्राहकांची वाढीव वीज बिले माफ करा : हर्षवर्धन पाटील

Forgive the increased electricity bills of farmers and consumers: Harshvardhan Patil : शेतकरी आणि ग्राहकांचे वाढीव वीज बिले माफ करा : हर्षवर्धन पाटील

एमपीसी न्यूज – शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या वीज बिलामध्ये कुठल्याही प्रकारची मोजमाप न करता अन्यायकारक वाढ केलेली आहे. याला भाजपचा विरोध आहे. ही वीज बिले अन्यायकारक असून महाराष्ट्र सरकारने ती त्वरित मागे घेऊन लॉकडाऊन काळातील नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना वीज बिले माफ करावी, अशी मागणी माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली.

केंद्र सरकार पॅकेज देत असेल तर राज्य सरकारने एक नवा पैसा जनतेला दिला नाही, म्हणून सरकारने हे वीज बिल माफ करावे, असेही ते म्हणाले.

जून महिन्यामध्ये राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या या सर्वांना वाढीव वीज बिलाची आकारणी करून त्याचे वाटप करण्यात आले. त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीने गुरुवारी पुण्यातील रास्ता पेठ येथे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीसमोर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी वीज बिल माफीची मागणी केली.

या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी हातात कंदील घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि वाढीव वीज आकारणी बिलाची होळी करून निषेध केला.

यावेळी भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार भीमराव तापकीर, भाजपचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी वाढीव वीज बिले देण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर केले असताना भरमसाठ वीज बिल आकारणे चुकीचे असल्याचे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.