Pune : भाजपाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, पर्वती विधानसभा ( Pune) मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे   यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर  रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई ,नातवंडे असा परिवार आहे. 

Pune : फलाटांच्या कामामुळे पुणे- मुंबई दरम्यानच्या या रेल्वे गाड्या होणार रद्द, प्रवाशांची होणार गैरसोय

 

विश्वासरावांचे वडील कृष्णराव गांगुर्डे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अतिशय जवळचे स्नेही होते. त्यामुळे विश्वासरावांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सहवास लाभला. 1978 मध्ये दत्तवाडी- राजेंद्रनगरमधून ते पहिल्यांदा पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर 1992-1997 काळात गणेशखिंड भागातून नगरसेवक पद भुषविले.

विश्वासराव हे विचारवंत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे ते नेहमीच पुरस्कर्ते होते. त्यामुळे इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर आणीबाणी विरोधात त्यांनी मोठा संघर्ष उभा केला. 1992 -1995 या काळात ते पुण्याचे शहराध्यक्ष होते. भाजपा शहराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाचे काम पुणे शहरात तळागाळापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले.

1980-85 आणि 1985 -90 दोनवेळा पर्वती विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. मात्र दुर्दैवाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, 1999 मध्ये ते पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. या काळात त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडविले.

गांगुर्डे यांच्या निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी ते म्हणाले, ‘रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, भाजपाचे माजी शहराध्यक्ष आणि पर्वती मतदारसंघाचे माजी आमदार विश्वासजी गांगुर्डे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. भाजपाचे काम तळागाळात नेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कवी मन आणि सतत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही ( Pune) सहभागी आहोत.’

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.