Pune : पुण्याच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे निधन

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे आज ( Pune ) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. भावाचे निधन झाल्याने त्या अंत्यदर्शनासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी रडल्याने त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी यांची त्यांना मृत घोषित केले. भाऊ आणि बहिणीचे एकाच दिवशी निधन झाल्याने त्रिभुवन कुटुंबीयांवर शोककाळा पसरली.

Alandi : माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या दीड महिन्यावरती असताना इंद्रायणी नदी पुन्हा जलप्रदूषणाने फेसाळली

रजनी त्रिभुवन या 2004 ते 2006 या कालावधीत पुणे शहराच्या महापौर होत्या. महापौर असतानाच्या कालावधीत त्यांनी पुणे शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता. आपल्या हजर जबाबीपणामुळे आणि दूरदृष्टीपणामुळे त्यांच्या काळात शहरातील अनेक प्रश्न मार्गी लागले.

शहरातील अडचणी सोडवण्यासाठी माजी महापौरांनी एकत्र येऊन काही वर्षांपूर्वी एक संघटना स्थापन केली होती. या संघटनेत रजनी त्रिभुवन यांचा देखील समावेश होता. वाहतुकीची कोंडी आणि रस्त्यावरील खड्डे हे प्रश्‍न संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले होते. याशिवाय रजनी त्रिभुवन यांनी काँग्रेस पक्षात विविध जबाबदाऱ्या देखील यशस्वीपणे पार ( Pune ) पाडले आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.