BNR-HDR-TOP-Mobile

Pune : माजी आमदार जगदीश मुळीक होणार पुणे शहर भाजपचे अध्यक्ष!; स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांचा खासदार गिरीश बापट यांनी केला पत्ता कट

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून होणार होणार म्हणून चर्चेत असलेल्या पुणे शहर भाजपच्या अध्यक्षपदी माजी आमदार जगदीश मुळीक यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. बुधवारी यासंदर्भातील अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती आहे. स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांची निवड होऊ नये, यासाठी गिरीश बापट यांनी जोरदार विरोध केल्याचे समजते.

स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांना 2019 च्या कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू नये आणि आता शहराध्यक्षपदी वर्णी लागू नये, यासाठी बापट यांनी तीव्र विरोध केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. कसबा मतदारसंघात बापट यांनी ‘झेंडा अनेकांच्या हातात दिला, पण, ‘दांडा’ त्यांच्याकडेच असल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली होती.

गणेश बिडकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. मात्र, त्यांचे बापट यांच्याशी फारसे पटत नाही. मुळीक यांचे बापट, फडणवीस, पाटील यांच्याशीही चांगले संबंध आहेत. त्यामुळेच शहराध्यक्षपदीच्या त्यांच्या निवडीची केवळ घोषणा बाकी आहे.

मंगळवारी झालेल्या महापौर बांगला येथील बैठकीत आढावा घेण्यात आला. येत्या दोन वर्षांतच महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यादृष्टीने नवीन अध्यक्षांचा कस लागणार आहे. आगामी महापालिकेची निवडणूक वार्ड पध्दतीने होणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like