Pune : माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी मिळणार

Former MLA Pvt. Medha Kulkarni will get a big responsibility in the party organization

एमपीसी न्यूज – कोथरूडच्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना पक्ष संघटनेत काम करण्यासाठी मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्ष त्यांना नेमकी कोणती जबाबदारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढविली. ते विजयी सुद्धा झाले. त्यावेळी इच्छुक असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना पुणे महापालिकेचे महापौर करण्यात आले. तर, मेधा कुलकर्णी यांनाही चांगले पद मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते.

मध्यंतरी विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यावेळी कुलकर्णी यांना संधी मिळणार असल्याची कुजबज होती. मात्र, त्यांना संधी काही मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आगामी नव्या कार्यकारिणीत मोठी संघटनात्मक जबाबदारी मिळणार असल्याचे समजते.

मेधा कुलकर्णी कोथरूड विधानसभा मतदारसंघात सक्रीय असतात. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे, तिकीट कापलेल्या चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, नाराज असलेले एकनाथ खडसे यांना पक्ष संघटनेत काम करण्यासाठी कोणती संधी मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.

चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जुलै महिन्यात संघटनात्मक बदल होणार आहेत. विधानसभा निवडणुकीत सत्ता न आल्याने अनेकांना संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.