Pune : शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे करोनामुळे निधन

Former Shiv Sena corporator Vijay Maratkar dies due to corona

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर (वय 67) यांचे आज, मंगळवारी सायंकाळी कोरोनामुळे निधन झाले. त्यांना कोरोनासह इतरही आजार होते. केईएम रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

मारटकर यांच्या मागे पत्नी, 2 मुले, 2 मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ युवासेना प्रमुख दीपक मारटकर यांचे ते वडिल होत.

विजय मारटकर यांच्या निधनाची बातमी समजताच शिवसैनिकांनी रुग्णालयात धाव घेतली. मारटकर हे 2002 मध्ये प्रभाग पध्दतीने पहिल्यांदा शिवसेनेकडून निवडून आले होते. 2007 मध्ये वॉर्ड पद्धतीनेही ते दुसऱ्यांदा विजयी झाले होते. त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख म्हणूनही काम केले.

बुधवार पेठेतील देवदासींचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम मारटकर यांनी केले. त्यांच्या निधनाने अनेकांना मानसिक धक्काच बसला. शिवसैनिकांच्या हाकेला ते धावून जात असत. त्यांचा अतिशय चांगला जनसंपर्क होता.

दरम्यान, कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्याने झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. पुणे शहरात कोरोनाचे 39 हजार 203 रुग्ण झाले आहेत.

शहरात ऍक्टिव्ह रुग्ण 14 हजार 757 आहे. 23 हजार 441 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 1 हजार 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यव नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त लठ्ठपणा, मधुमेह, किडनी, हृदयविकार असे अनेक आजार होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III