Pune : अज्ञात चोरट्यानी चोरली नगरसेवक दीपक पोटे यांची फॉर्च्युनर गाडी

एमपीसी न्यूज- पुण्यातील भाजपचे नगरसेवक दीपक पोटे यांची फॉर्च्युनर गाडी अज्ञात चोरट्यानी चोरून नेली. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक पोटे हे पुणे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक आहेत. सिंहगड रस्त्यावरील एका सोसायटीत ते राहतात. काल रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी आपली फॉर्च्युनर गाडी घराच्या पार्कींगमध्ये लावली होती. आज सकाळी उठून पाहिले असता गाडी जागेवर नव्हती. त्यानंतर गाडी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दत्तवाडी पोलिसात धाव घेत याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.