Pune: ‘मनोरंजन’चे संस्थापक मनोहर कुलकर्णी यांचे निधन 

एमपीसी न्यूज – जेष्ठ रंगकर्मी, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पुणे शाखेचे माजी अध्यक्ष आणि मनोरंजन,पुणे या जाहिरात संस्थेचे संस्थापक-संचालक मनोहर तथा अण्णा चिंतामण कुलकर्णी (वय 92) यांचे आज (गुरुवारी) पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले.

मनोहर कुलकर्णी यांच्या मागे मोहन कुलकर्णी व मदन कुलकर्णी हे दोन मुलगे, मीना ही कन्या तसेच सून व नातवंडे असा परिवार आहे. पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात ते  ५० वर्षे कार्यरत होते. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 2000 साली शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार मिळाला होता. पुणे मनपाचा 2017 सालचा बालगंधर्व पुरस्कार मिळाला होता. सांस्कृतिक क्षेत्राचा भक्कम आधार म्हणून ते ओळखले जात.

मनोरंजन संस्थेचे संचालक मोहन कुलकर्णी यांचे ते वडील होत. सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंतांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.