Pune : लॉकडाऊनमध्ये सिगारेट आणि तंबाखू विकणाऱ्या चौघांना अटक; १४ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज : लॉकडाऊनच्या काळात सिगारेट आणि तंबाखूची चोरून विक्री करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने छापा मारून अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटारी आणि सिगारेट व तंबाखू असा एकूण १४ लाख ४१ हजार २ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

रोहीत सिताराम प्रजापती (वय २३, रा. महाल्क्षमी काॅम्लेक्स, शिवणेगांव, पुणे), विजय सिताराम प्रजापती (वय २५), पंकज शिवनारायण प्रजापती (वय २२ दोघे रा.शिवणेगाव ), मुकेश पारसमल छाजेड (वय ४०, रा. ८८० वीर लहूजी सोसा., सहकारनगर, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

युनिट एकच्या पथकातील पोलीस नाईक सचिन जाधव यांना शिवणे येथे चोरून सिगारेट आणि तंबाखू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार युनिट एकचे पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे यांच्यासह सचिन जाधव, पोलीस कॉन्स्टेबल गजानन सोनावणे, पोलीस नाईक वाघावले यांच्या पथकाने शिवणे येथील महालक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे छापा मारला. त्यावेळी आरोपी तेथे चोरून सिगारेट आणि तंबाखूची विक्री करताना आढळून आले.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करून अटक केली. या कारवाईत आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटारी आणि सिगारेट व तंबाखू, अशा एकूण १४ लाख ४१ हजार २ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या सर्व आरोपीना पुढील कारवाईसाठी उत्तमनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.