Pune: वानवडीतील ‘त्या’ अल्पवयीन मुलाचा खून खंडणी प्रकरणातून, चार जण अटकेत

खून झालेला मुलगा अल्पवयीन असून त्याने खंडणी मागितल्यामुळे आरोपींनी खून केल्याचे पोलीस तपासात सांगितले. 

एमपीसी न्यूज – वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 10 जुलै रोजी खुनाचा प्रकार उघडकीस आला होता. दगडाच्या ढिगाऱ्याखाली अवस्थेत एक मृतदेह लपून ठेवल्याचे पोलिसांना आढळले होते. कोंढवा पोलिसांनी पुण्याच्या या गुन्ह्याची उकल केली असून चार जणांना अटक केली आहे. खून झालेला मुलगा अल्पवयीन असून त्याने खंडणी मागितल्यामुळे आरोपींनी खून केल्याचे पोलीस तपासात सांगितले. 

अझान जहीन अन्सारी (वय 12) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी रोहित गौतम बनसोडे (वय 27), अजय विजय गायकवाड (वय 22), श्रीकांत भीमराव साठे (वय 20), अक्षय अनिल जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

खुनाचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये अझन अन्सारी हरवल्याची तक्रार त्याच्या आईने दिली होती. त्यामुळे कोंढवा पोलिसही या प्रकरणाचा तपास करत होते.

अन्सारी हा गुन्हेगारी स्वरूपाचा होता. त्याने रोशन सिंग याच्याकडे खंडणी मागितली होती. अन्यथा टपरी जाळून टाकण्याची धमकी दिली होती. सतीश गायकवाड यालाही अन्सारीविषयी राग होता. याच रागातून आरोपींनी 8 जुलै रोजी अपहरण केले.आणि वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका जंगलात नेऊन त्याला दारू पाजली आणि डोक्यात आणि चेहऱ्यावर दगड घालून खून केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.