BNR-HDR-TOP-Mobile

Pune : संदीप देवकर खून प्रकरणी चौघांना अटक

हातगाडी लावण्याच्या वादातून केला खून

588
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- हातगाडी लावण्याच्या वादातून एकाचा निर्घृणपणे खून करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातून गुरुवारी (दि.10) सापळा रचून अटक केली आहे.

.

गणेश शांताराम चौगुले ऊर्फ बोरकर (वय 24, रा.सुभाषनगर येरवडा), विशाल नागनाथ कांबळे (वय 22, रा.लक्ष्मीनगर, येरवडा), रोहित प्रकाश कोळी (वय 26, रा. गणेशनगर येरवडा), मयूर सुनील सूर्यवंशी (वय 25, रा. रविवारपेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

संदीप ऊर्फ अण्णा सुभाष देवकर (वय 49, रा. नवी खडकी येरवडा) यांचा रविवारी (दि.6) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान येरवडा येथील वार्ड ऑफिसलगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ गोळ्या घालून व तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत संदीप देवकर आणि यातील आरोपींचे हातगाडी लावण्याच्या कारणावरुन वाद झाले होते. आणि याच कारणावरुन संदीप देवकर याचा आरोपींनी निर्घृण खून करण्यात आला होता. खून करून पसार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत होते. तपासादरम्यान पोलिसांना खबऱ्याकडून खुनातील आरोपींचा ठिकाणा समजताच त्यांनी सापळा रचून पुणे स्टेशन परिसरातून अटक केली. मात्र गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जावेद सय्यद व अशरफ पठाण हे दोघे अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: