Pune : ससून रुग्णालयात आज 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

Four died of corona at Sassoon Hospital today

एमपीसी न्यूज – ससून रुग्णालयात आज, मंगळवारी आणखी 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे  कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसून येत नाही. आतापर्यंत या रुग्णालयात कोरोनामुळे 143 जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. तर, 143 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

कोरोनामुळे ससून रुग्णालयात आतापर्यंत 143 जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले.  आज येरवड्यातील 30 वर्षीय महिला, नाना पेठेतील 76 वर्षीय पुरुष, पुणे कॅम्पमधील 48 वर्षीय आणि हडपसरमधील 67 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्तही उच्चरक्तदाब, हृदयाचा, मधुमेह, लठ्ठपणा असे अनेक आजार होते.

_MPC_DIR_MPU_II

कोरोनामुळे कमी, तर कोरोना व्यतिरिक्त इतर आजार असलेल्या रुग्णांचेच मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचे ससून रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले. कोरोनमुक्त झालेल्या 4 जणांना आज ससूनमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात आज कोरोनाचे तब्बल 404 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या आता 6 हजार 303 झाली आहे. तर जिल्ह्यात कोरोना बाधित 3 हजार 195 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

सध्या ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 819 आहे. कोरोनाबाधित एकूण 289 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 208 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

पुणे शहरातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढते आहे. सध्या कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्याने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जेष्ठ नागरिकांनी कोरोना पासून विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1