Pune : ‘ससून’मध्ये आज चौघांचा मृत्यू, दोघांना डिस्चार्ज; मृतांचा आकडा 103 वर

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील ससून रुग्णांलयात आज ( शनिवारी ) आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या रुग्णालयात आजपर्यंत कोरोनामुळे एकूण 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना आजारातून ठणठणीत बरे झालेल्या दोन रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. अशा प्रकारे आजपर्यंत कोरोनमुक्त झालेल्या एकूण 111 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आज नव्या सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.

बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविदयालय आणि ससून रुग्णांलयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी पत्रकान्वये ही माहिती दिली. कोरोनाचा पुण्यात शिरकाव झाल्यापासून पुणे शहरातील ससून रुग्णालयात कोरोनाचे जास्त मृत्यू झाले. तसेच याच रुग्णांलयातून कोरोनावर मात करून घरी परतलेल्या रुग्णांची संख्याही समाधानकारक आहे.

आज ( शनिवारी )  आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या रुग्णालयात आजपर्यंत कोरोनामुळे एकूण 103  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना आजारातून ठणठणीत बरे झालेल्या दोन रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. अशा प्रकारे आजपर्यंत कोरोनमुक्त झालेल्या एकूण 111 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्याचबरोबर आज एकूण 126 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी प्राप्त अहवालानुसार सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सध्या गंभीर स्थितीत असलेल्या 5  रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहेत. तर नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटरवर 19  आणि व्हेंटिलेटर शिवाय 14  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आज मृत्यू झालेल्या चार रुग्णांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि एका ट्रान्सजेंडरचा समावेश होता. यात ताडीवाला रोड येथील ६८ वर्षीय महिला, भवानी पेठेतील ४६ वर्षीय ट्रान्सजेंडर, रामटेकडी, हडपसर येथील ६३ वर्षीय पुरुष आणि गुलटेकडी येथील ७९ वर्षीय पुरुषाचा समावेश होता. या सर्व रुग्णांना गंभीर स्वरूपाचे आजार होते, अशी माहिती डॉ. तांबे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.