Pune : आंदगाव हायस्कूलमधील गरीब विद्यार्थ्यांना चार लाखांचे मोबाईल

Four lakh mobiles for poor students in Andgaon High School : ॲड. अनिल तांबे यांचा स्तुत्य उपक्रम

एमपीसी न्यूज – ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल ही शिक्षणाची प्राथमिक गरज निर्माण झाली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना ही गरज पूर्ण करता यावी यासाठी ॲड. अनिल तांबे यांनी स्तुत्य उपक्रम राबवला आहे. ॲड. तांबे यांनी मुळशी तालुक्यातील आंदगाव येथील आदिवासी व गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चार लाख रूपयांचे मोबाईल दिले.

पुणे येथील पत्रकार परिषदेत त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल सुपूर्द केले. आंदगाव येथील विद्या विकास मंदिर विद्यालयात आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात.

ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेण्याची त्यांची आर्थिक ताकद नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते डॉ. यशराज पारखी व शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र मारणे यांनी मोबाईल दान करण्याचे आवाहन केले होते.

या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ॲड. काळे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल दिले. यावेळी शाळेतील दहावीत शिक्षण घेणारे रोहन व शितल आखाडे यांना मोबाईल देण्यात आले.

तालुक्यातील प्रत्येक शाळेतील गरिब विद्यार्थ्यांना मोबाईल देण्याचा प्रयत्न आहे. तसेच वापरात नसलेला मोबाईल अशा विद्यार्थ्यांना दान करावा, असे आवहान डॉ. पारखी यांनी केले आहे.

वापरात नसलेला मोबाईल आणि 50 लॅपटॉप तालुक्यातील विद्यार्थ्यांना देण्याचे सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब देवकर यांनी जाहिर केले.

यावेेळी संस्थेचे सचिव सतिश दरेकर, उप अध्यक्ष अंकुश मारणे, मारूती आटाळे, मुख्यध्यापक के. जे. पवार, एन. डी. मारणे, शाम मारणे आदि उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.