Pune: पुण्यात कोरोनाबाधित आणखी चार रुग्णांचा मृत्यू; मृतांचा एकूण आकडा 38 वर

एमपीसी न्यूज – पुण्यात आज कोरोनाबाधित आणखी चार रुग्णांचा मृत्यू झाला असून आता मृतांचा एकूण आकडा 38 वर गेला आहे. मृतांमध्ये 3 महिला आणि एका 27 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तर आज आतापर्यंत चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात ससून रुग्णालयातील एका नर्सचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सध्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत आहेत. मात्र, कोरोना विषाणू तिसऱ्या टप्प्यात गेला असून आता कॉम्युनिटी स्प्रेड होत आहे. आज पुण्यात कोरोनाने चार जणांचा बळी घेतला आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची माहिती :
1) कोंढवा येथील 50 वर्षीय महिला असून त्यांना रक्तदाबाचा त्रास होता. यातच कोरोना झाल्याने आज त्यांचा मृत्यू झाला.

२) पार्वती दर्शन, येथील एका 27 वर्षीय तरुणांचाही मृत्यू झाला.  त्याला यकृताचा आजार झाला होता.

3) कोंढवा येथील 42 वर्षीय महिला असून त्यांना 12/4/2020 रोजी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना दमा, मधुमेह, रक्तदाब याचा त्रास होता. यातच त्यांना कोरोना झाल्याने आज त्यांचा मृत्यू झाला.

4) घोरपडी गाव येथील 77 वर्षीय महिलेलाही मूत्रपिंडाचा त्रास होता. त्यामुळे त्यांना 2/4/2020 रोजी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र,यातच कोरोना झाल्याने त्यांचा आज मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.