Pune : ससूनमध्ये आज आणखी 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

एमपीसी न्यूज – ससूनमध्ये बुधवारी आणखी 4 जणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. या रुग्णालयात आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोनामुक्त झालेल्या 103 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ससूनमध्ये मृत्यू झालेल्या येरवड्यातील 65 वर्षीय महिलेला कोरोना व्यतिरिक्त अतिसार, निमोनियाचा आजार होता. ताडीवाला रोड भागातील 42 वर्षीय पुरुषालाही निमोनिया, किडनी विकार होता.

रामटेकडी येथील 70 वर्षीय महिलेलाही निमोनिया, हडपसर येथील 48 वर्षीय पुरुषालाही कोरोना व्यतिरिक्त किडनी विकार, निमोनिया, हृदयाचा आजार होता, असे ससून रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुणे जिल्हयात 3 हजार 258 बाधीत रुग्ण आहेत. 1 हजार 358 कोरोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 730 आहे. कोरोनाबाधित एकूण 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 117 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

ससून रुग्णालयात सातत्याने कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मंगळवारी 3 जणांचा या रोगामुळे बळी गेला होता. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.

त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

दुसरीकडे कोरोनाच्या तावडीतून मुक्त होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. सध्या कोरोनामुळे बळी जाणाऱ्यांमध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.