Pune Fraud: सुरक्षा रक्षकाची फिल्ड ऑफिसरनेच केली फसवणूक

एटीएम घेऊन पगाराचे पैसे घेतले काढून

एमपीसी न्यूज:  पुण्यातील हवामान विभागात सुरक्षा रक्षक असणाऱ्या कामगाराच्या पगारी खात्यातून फिल्ड ऑफिसरनेच पैसे काढून रक्कमेचा अपहारकरून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Fraud) याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात विशाल खिलारे (वय 34) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, राजेंद्र काटकर (रा. येरवडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत घडला आहे.

 

 

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे खडकीमधील मेसर्स ईशा प्रोटेक्शनल सिक्युरिटी प्रा.लि. या कंपनीद्वारे पुणे हवामान विभागात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. त्यावेळी संशयित आरोपी राजेंद्र काटकर फिल्ड ऑफिसर म्हणून तेथे काम करत होता. यादरम्यान, त्याने तक्रारदार व इतर कामगारांचे कोथरूडमधील वैश्य बँकेत खाते सुरू केले. त्यांचे एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवले. (Pune Fraud) त्यांच्या एटीएम कार्डचा पिन जनरेट करण्यासाठी त्यांच्याच नावाने घेतलेले सिमकार्ड त्याच्याकडील मोबाईलमध्ये टाकून पिन जनरेट केला. त्यानंतर परस्पर कार्डचा वापरकरून त्यांचा आलेला पगार काढून घेतला. सरासरी 20 ते 22हजारांचा महिन्यांचा पगार काढून त्यातील केवळ 13ते 14 हजार रुपये त्यांना देऊन उर्वरित रक्कमेचा अपहारकरून फसवणूक केली आहे.  या प्रकरणी अधिक तपास खडकी पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.