Pune – शुटींगसाठी भाड्याने घेतलेले कॅमेरे परत न करता केली साडेआठ लाखांची फसवणुक

एमपीसी न्यूज – शुटींगसाठी भाड्याने घेतलेले कॅमेरे परत न करता तब्बल साडेआठ लाखांची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 16 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या कालावधीत रविवार पेठ येथील यांत्रिक हॉटेलसमोरील सार्वजनिक रोडवर घडली आहे.
याप्रकरणी शैलेश राशीनकर (वय 41, रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शैलेश राशीनकर यांना एका व्यक्तीने शुटींगसाठी कॅमेरा पाहिजे असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. कॅमेराचे रोजचे दीड हजार भाडे देतो असे सांगून त्यांच्याकडून शुटींगसाठी एकूण तीन कॅमेरे घेतले. परंतु त्या व्यक्तीने फिर्यादी यांच्याकडून 16 ऑक्टोबरला घेतलेले तीन कॅमेरे तसेच त्याचे भाडे आजपर्यंत परत न करता फिर्यादी यांची तब्बल 8 लाख 60 हजारांची फसवणुक केली.
याप्रकरणी तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.