Pune : बनावट कागदपत्रे जमा करून 12 लाखांचे पर्सनल लोन घेऊन केली फायनान्स कंपनीची फसवणूक

एमपीसी न्यूज – पर्सनल लोनसाठी बनावट कागदपत्रे देऊन कंपनीची तब्बल 12 लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही फसवणूक डिसेंबर 2017 ते आजपर्यंत शिवाजीनगर जे.एम.रोड येथील इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स कंपनीत झाली आहे.

याप्रकरणी औंध येथे राहणाऱ्या एका 65 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर जे.एम. रोड येथील फायनान्स कंपनीकडून दोघांनी मिळून कर्ज काढण्यासाठी आधारकार्डवर खोटा पत्ता तसेच अक्सिस बँकेचे बनावट अकाउंट उघडून तसेच काँगनीझंट कंपनीची खोटी पगार स्लीप बनवून कंपनीचा विश्वास संपादन केला. आणि कंपनीकडून कर्ज घेऊन 11 लाख 59 हजार 486 रुपयांची कंपनीची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांवर फसवुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डेक्कन पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.