Pune: आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत आठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – शेअर मार्केटची माहिती देऊन दोन कंपन्यांच्या आयपीओ (Pune)मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत एका व्यक्तीची आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 28 नोव्हेंबर 2023 ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत बावधन येथे घडली.
आकाश विजय भावसार (वय 35 रा बावधन ता मुळशी)  यांनी हिंजवडी पोलीस (Pune)ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri: कॅन्सर पीडित महिला आणि अंध मुलींनी केला रॅम्पवॉक ;एक हात मदतीचा आगळावेगळा फॅशन शो

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी फेसबुकद्वारे stock market Elite club a 15 हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला. ग्रुप वरील अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीस शेअर मार्केट बद्दल माहिती दिली.
फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना Maxposure, Medi Assist Healthcare Services या कंपन्यांचे आयपीओ घेण्यास सांगितले. त्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने आठ लाख रुपये घेत त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.