Pune : दुकान भाड्याने देण्याच्या बहाण्याने साडेआठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज- दुकान भाड्याने देण्याच्या बहाण्याने एकाची साडेआठ लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी समीर पटेल (वय 41, रा. कॅंम्प, पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अल्ताफ ऊर्फ काटा शेख (वय 37, रा. कॅंम्प, पुणे ) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समीर पटेल यांना अल्ताफ शेख आणि त्याच्या इतर चार साथीदारांनी मिळून एम.जी.रोड येथील दुकान भाड्याने देण्याच्या आणि पावती फिरवण्याच्या बहाण्याने खोटी कागदपत्रे बनवली आणि त्यावर खोट्या सह्या करून फिर्यादी समीर यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर समीर यांच्याकडून दुकान भाड्याने देण्यासाठी वेळोवेळी तब्बल 8 लाख 46 हजार एवढी रक्कम घेतली परंतु समीर यांना दुकान न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली.
पुढील तपास लष्कर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.