Pune: क्रिप्टो करन्सी चे शेअर खरेदी च्या बहाण्याने एकाची साडे चार लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – क्रिप्टो करन्सी चे शेअर खरेदी  मधून नफा मिळवण्याचे (Pune)अमिष दाखवून एका नागरिकांची साडे चार लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक 16 जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने घडली आहे.
याप्रकरणी मनोज प्रेमनारायण परमार ( वय 47 रा. हिंजवडी फेज 2) यांनी(Pune) शुक्रवारी (दि.1) यांनी टेलिग्राम खाते धारक @ANYA5525 याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादी यांच्या व्हाट्सापवर लिंक पाठवून youtube channel साबस्क्राईब करण्यास सांगून 50 रुपयांचा मोबदला देत विश्वास संपादन केला. पुढे क्रिप्टो करन्सी चे शेअर खरेदी  करण्यास सांगितले फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेत 4 लाख 88 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.