Pune : स्वीडिश व्यवस्थापनशास्त्र तज्ञ डॉ फ्रेडरिक बिल यांची व्याख्याने

एमपीसी न्यूज- स्वीडिश व्यवस्थापनशास्त्र तज्ञ डॉ फ्रेडरिक बिल यांची भारती विद्यापीठ ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आय एम इ डी) मध्ये एमबीए द्वितीय वर्ष व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.

लिनस युनिवर्सिटी(स्वीडन) आणि भारती विद्यापीठ आय एम इ डी मधील शैक्षणिक आदान प्रदान कार्यक्रमांतर्गत डॉ फ्रेडरिक येथे आले आहेत. उद्योजकता विकास, धोरणात्मक व्यवस्थापन इत्यादी विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.