Pune : भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पाच हजार नागरिकांना मोफत शिधा वाटप

एमपीसी न्यूज – भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पुणे महानगरपालिका प्रभाग क्र.10 बावधन-कोथरूड डेपो परिसरात नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी 5 हजार गरजू कुटुंबाना मोफत शिधा वाटप करण्यात आले.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सचिव राजेश पांडे, रवी अनासपूरे, दिगंबरजी परूळेकर, सुधीरजी जवळेकर, नगरसेवक किरण, अल्पना वरपे, श्रद्धा प्रभुने पाठक आदी उपस्थित होते.

गव्हाचे पीठ, तांदूळ, तेल, साखर, चना डाळ, हरभरा, हुलगा, मीठ, मसाले, साबण अशा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार आहे. माझा प्रभाग, माझी जबाबदारी हे ब्रीद नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी स्वागत केले. वेडेपाटील यांनी लॉकडाउन सुरू झाले तेंव्हापासून आजतागायत सुरू असलेल्या निर्जंतुकीकरण फवारणी, प्रभागातील सोसायटींचे सुरक्षा रक्षक अथवा कामगार ज्यांचा परिवार नाही.

अशा ५०० नागरिकांना दररोज न चुकता जेवण वाटप, विशेष म्हणजे भटक्या कुत्र्यांसाठी पेडिग्री उपलब्ध करून देण्याचे अत्यंत महत्वाच्या कामाचे कौतुक मान्यवरांनी केले.

‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या जागतिक आपत्तीमध्ये पुण्यासारख्या शहरालाही मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वांना घराबाहेर येवू नका हे ज्या हक्काने आम्ही सांगत आहोत, त्याच हक्काने कोणी उपाशी राहणार नाही, याची काळजी देखील माझ्या प्रभागात घेतली जाईल.

‘कोरोना’शी लढण्यासाठी आम्ही सारे एक आहोत. एकीने कोरोनाचा सामना करू, हा संदेश देण्यासाठी प्रत्येक गरजूच्या घरी महिनाभराचा किराना माल पोहोचवू, अशी घोषणा नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.