Pune : राष्ट्रवादीतर्फै नागरिकांना एन 95 मास्कचे मोफत वाटप

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग नं. 17 मध्ये रास्ता पेठ भाजी मंडई येथे जसबीरकौर राजपाल यांच्या स्मरणार्थ नागरिकांना मोफत एन 95 मास्कचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिख अल्पसंख्याक सेलचे पुणे शहर कार्याध्यक्ष रामिंदर सिंघ राजपाल यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस माजी महापौर मोहनसिंग राजपाल, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे अध्यक्ष भोलासिंग अरोरा, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष विनायक हनमगर, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे कार्याध्यक्ष फहीम शेख, कसबा मतदार संघाचे कार्याध्यक्ष गणेश नलावडे, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे ब्लॉक अध्यक्ष जयकुमार राघवाचारी, विनोद काळोखे, सोमनाथ कुलकर्णी, अमर पुणेकर, वि. जि. अय्यर, देवेंद्र दड्डीकर, गणेश लिम्हन, वैभव बेंद्रे, प्रशांत सुरगंध, अनिकेत शेलार, सुरिंदरपाल सिंघ छाब्रा, कुलदीप सिंघ टूटेजा, अक्षय मांडवकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.