Pune : येरवडा प्रभाग सहामध्ये कोरोनाची मोफत तपासणी

एमपीसी न्यूज – येरवडा प्रभाग 6 मध्ये कोरोनाची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवसेना नगरसेवक संजय भोसले, अविनाश साळवे, श्वेता चव्हाण, भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर या संस्थेच्यावतीने ही तपासणी करण्यात येणार आहे.

येरवडा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक हॉल हॉलच्या बेसमेंट पार्किंग परिसरात कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. रोज सकाळी 10 ते 4 या वेळेत ही तपासणी होणार आहे. रविवारी तपासणी बंद राहील.

तपासणीसाठी येताना स्वतःचे आधार कार्ड आणावे, कोणाच्या घरात पॉझिटीव्ह पेशंट आढळल्यास अशा नागरिकांनी तत्काळ संपर्क साधावा, ज्या कोणाला सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे असा त्रास असल्यास अशांनी ताबडतोब संपर्क साधावा, ज्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा वरील सांगितल्याप्रमाणे त्रास होत नाही अशांनी विनाकारण तपासणीसाठी जाऊ नये.

यामुळे उलट पॉझिटिव्ह पेशंटचा संपर्क आल्यास त्रास होऊ शकतो. नागरिकांच्या काही समस्या असतील तसेच प्रभागातील काही साफ-सफाई संदर्भात अडचणी असतील तर तातडीने संपर्क साधावा. विनाकारण घराबाहेर पडू नका.

पोलीस कर्मचारी , डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी यांना घरात बसूनच सहकार्य करा. वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच या आजाराची साखळी तोडण्यासाठी आपण घरातच रहा, जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.