Pune : अंध मुलींना मोफत मास्क, सॅनिटाइजरचे वाटप

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’पासून बचावासाठी केअर टेकर्स सोसायटीच्या वतीने नऱ्हे, आंबेगाव येथील लुईल ब्रेल संस्थेचे अंधमुलींचे वसतिगृहातील अंध मुलींना मोफत मास्क आणि सॅनिटाइजरचे वाटप केअर टेकर्स सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सुफियान शेख आणि केअर टेकर्स सोसायटीचे सभासद जितेंद्र राशिनकर, करन राशिनकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन देडगावकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे आयोजन कुमार शिंदे, बालसुंदर ठुबे, इरफान मुल्ला, रणजित परदेशी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.